नवी मुंबई : तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हस्ते उद्घाटन झालेल्या नेरूळ येथील वंडर्स पार्कमधील स्काय स्विंगर पाळणा राईड्सचा शनिवारी साडेआठ वाजता अपघात झाला आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले. असून त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. राईड सुरू होऊन अवघ्या तीन दिवसातच अपघात घडल्याने वंडर्स पार्कमधील कामांवर सवाल उपस्थित केला जात आहे.
अतिशय गाजावाजा करत ३० मे रोजी नेरूळमधील वंडर्स पार्कचे लोकार्पण करण्यात अवघ्या तीन दिवसातच या ठिकाणी अपघात घडला आहे. वंडर्स पार्कमधील स्काय स्विंगर पाळणा राईड्समध्ये घडली दुर्घटना घडली आहे. राईड चालू असताना कंत्राटदाराचे प्रोग्रामर प्रोग्रामिंग करत होते, त्यावेळी राईड चालू असताना ती खाली येताना थांबली नाही आणि खालील लोखंडी संरक्षक कठड्याला सर्व पाळणे घासत घासत गेले आणि त्यामध्ये सहा नागरिकांना दुखापत झाली. या सर्वांना उपचाराखातर नजीकच्या आपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
या राइडस सुरक्षित नव्हत्या तर सुरक्षिततेची कुठलीही तपासणी केली नव्हती तर घाईघाईने या वंडर्स पार्कचे उद्घाटन का करण्यात आले? असा आरोप मनसेने केला आहे. यामध्ये नागरिकांचा जीव गेला असता तर याला जबाबदार कोण? त्यामुळे पालिकेचे प्रशासकीय अधिकारी तसेच या वंडर पार्कचे कंत्राटदार यांची चौकशी करण्यात यावी आणि जोपर्यंत या वंडर्स पार्कचे आयआयटीसारख्या संस्थेमार्फत ऑडिट आणि तपासणी होत नाहीत तोपर्यंत हे वंडर्स पार्क बंद ठेवण्यात यावे आणि सर्व सुरक्षिततेचे खात्री झाल्यानंतरच वंडर्स पार्क सुरू करावे, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.
वंडर्स पार्क येथील सातही राईड्स १ जून रोजी सुरू झाल्यापासून व्यवस्थित सुरू होत्या. वंडर्स पार्कचे परिचलन करणाऱ्या मे.अश्विनी कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रा यांच्यामार्फत सर्व सातही राईड्सवर स्वतंत्र ऑपरेटरची व्यवस्था करण्यात असून टेक्निशियन मार्फत नियमीत तपासणीही करण्यात येत होती. ३ जून रोजी टेक्निशियनमार्फत स्काय स्विंगर या राईडची तांत्रिक तपासणी सुरू असताना हा अपघात घडला. अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब असून याची तत्परतेने सखोल चौकशी करून संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.