रोहित पोळ, श्रीकांत उबोळे, सचिन मोरे चमकले 

ठाणे: येथील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आज झालेल्या ‘ब’ गटातील उपांत्य फेरीत मुंबई पोलीस संघ ‘ब’ ने टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबचा तब्बल २२८ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

नाणेफेक जिंकून टाइम्सने क्षेत्ररक्षण स्वीकारले पोलीस संघातर्फे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना रोहित पोळने ८४ चेंडूत ७ चौकार व ११ षटकारांसह १४८ धावांची खेळी केली. त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या करणाऱ्या श्रीकांत उबोळेनेही ७० चेंडूत १३ चौकार व ५ षटकारांसह मदतीने १२१ धावा फटकावून पोलीस संघाच्या डावास आकार दिला. मग डावखुरा मध्यमगती गोलंदाज सचिन मोरेने टाइम्सचा निम्मा संघ १७ धावात गुंडाळून मुंबई पोलीस संबद्घ ‘ब’ चा तब्बल २२८ धावांनी विजय साजरा केला. शतकवीर रोहित पोळ यांची सामनावीर म्हणून पंच स्वप्नील कोतावडेकर नितीन वाणी यांनी निवड केली.

संक्षिप्त धावफलक : ‘ब’ गट: उपांत्य फेरी मुंबई पोलीस संघ ‘ब’ ३५ षटकात ४ बाद ३४३ (तनिश मेहेर २४, रोहित पोळ १४८, श्रीकांत उबोळे १२१, प्रथमेश दुभाषी ५-०-४९-२, प्रश्नात जाधव ४-०-४३-१, असिफ सईद ३-०-३५-१) विजयी वि. टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लब २५.४ षटकात ११५ (अर्निबन चौधरी २३, योगेश पाटील ३-०-१७-१, अतुल मोरे ४–२१-२, रोहित पोळ ३-०-२२-१, सचिन मोरे ५.४-०-१७-५)