ठाणेकरांची सावली १७ मे ला अदृश्य होणार !

ठाणे : आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असे म्हटले जात असले तरी ते शंभर टक्के सत्य असतेच असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की, ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते. या दिवसांना ‘शून्य सावलीचा दिवस‘ असे म्हटले जाते.

बुधवार, १७ मे रोजी मध्यान्ही ठाणेकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. बुधवार १७ मे रोजी दुपारी १२ वाजता घंटाळी मैदान नौपाडा ठाणे येथे मराठी विज्ञान परिषदेतर्फे शून्य सावलीचे प्रात्यक्षिक दाखवून संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण व कार्यवाह प्रा.ना.द. मांडगे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेने दिली आहे.