मैत्री वाढली, वज्रमूठ आवळली!

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून सध्या वातावरण भलतेच तापले आहे. भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सावरकर गौरव यात्रा काढली आणि बऱ्याच दिवसांनी उभयतांमध्येदरु्मिळ होत चाललेले मैत्रीचे दर्शन घडले. तर दसरीकडे ु संभाजीनगर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने ‘वज्रमूठ’ दाखवत राज्यातील सरकारविरुद्ध हल्लाबोल के ला. भाजपाच्या सततच्या दबावनीतीमुळे महाविकास आघाडी पूर्वीपेक्षा अधिक एकसंघ झाल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले. राजकारणातील हुलकावणी देणारी ही स्थिती सावरकरांमुळे निर्माण झाली असेल तर किमान पक्षी सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे आभारच मानायला हवेत! राज्यातील सत्तांतरानंतर सत्तारूढ आणि विरोधी पक्ष आगामी निवडणुकीच्या दृष्टीने एखाद्या ठोस मुद्द्याच्या शोधात असणार. एकमेकांची उणीदणु ी काढून निवडणुकीसाठी लागणारी वातावरणनिर्मिती करता येत नसते. त्यांचा उपयोग तोंड लपवण्यापुरता असू शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीने सरकार चालवताना के लेल्या चुकांवर सातत्याने हल्ला करीत राहण्याचा मुद्दा मतदारांवर अपेक्षित परिणाम करू शकणार नाही. विधानसभेच्या निवडणुका लागेपर्यंत हे मुद्दे जनतेच्या स्मृतीपटलावरून पुसलेही गेले असतील. तद्वत शिंदे-फडणवीस सरकारचा साधारण वर्षा-दीड वर्षाचा काळ लोटला जाणार असल्यामुळे त्यांच्या चुका दाखवण्याची संधी महाविकास आघाडीला मिळूशकते. एकमेकांच्या चुका दाखवण्यापेक्षा चुका सुधारण्याचा कोण प्रयत्न करतो त्याच्या बाजूने मतदार कौल देऊ शकतील. अशा स्थितीत सावरकर यांच्यासारखा इतिहासजमा झालेला मुद्दा किती परिणाम साधू शके ल हा प्रश्नच आहे.
सावरकरांबद्दल महाराष्ट्रातील जनतेला आदर आहे, तो वृद्धिंगत करण्याचे नैतिक बळ विद्यमान पुढार्यांत नाही आणि त्यांची प्रतिमा डागाळण्याइतकी त्यांची कु वत नाही. त्यामुळे खरेतर सावरकरांबद्दल बोलून त्यास निवडणूकविषयक मुद्दा बनवणे याबद्दल आम्ही साशंक आहोत. संभाजीनगर येथील सभेत श्री.ठाकरे यांनी
सावरकर यांच्याविषयी बोलण्यापेक्षा पंतप्रधान मोदींवर टीका करणे उचित समजले. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल के लेल्या विधानांवर आक्षेप नोंदवून त्यांनी त्यांचा पक्ष स्वातंत्र्यवीरांच्याच पक्षात आहे हे सिद्ध के ले. त्यामुळे सहाजिकच मोर्चा मोदी यांच्याकडे वळवण्यात आला. हिदं ू राष्ट्र संकल्पनेला उघडपणे समर्थन करायचे तर धर्मनिरपेक्षता भग्न होण्याची भीती असते. परंतु श्री. ठाकरे यांनी सभेच्या सुरुवातीस भारतमातेच्या प्रतिमेसमोर ठे वलेल्या घटनेच्या प्रतीचे पूजन के ले. ही कल्पकता त्यांच्या विरोधकांना अस्वस्थ करू शकते. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश अध्यक्षीय हुकू मशाहीच्या दिशेने सरकू लागल्याचे सूचक उद्गार
काढून ठाकरे यांनी निवडणुकीचे रणांगण दर असले ू तरी आपल्या तोफे ची दिशा आणि त्यात वापरला जाणारा दारूगोळा यांची कल्पना शिंदे-फडणवीस सरकारप्रमाणेच कें द्रातील सत्ताधीशांना दिली आहे. परंतु अशा दारूगोळ्यापेक्षा सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असंख्य जिव्हाळ्याचे प्रश्न राजकारण्यांचे लक्ष जाईल याकडे डोळे लावून वाट पाहत बसले आहेत. हे नक्की !