ठाणे: ठाण्यात कौपीनेश्वर मंदिर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित केलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत क्रीडा भारती (ठाणे) च्या एरियल सिल्क चित्ररथसदृश सादरीकरणाला सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणून पहिले पारितोषिक मिळाले आहे.
एरियल सिल्क हा एक ऍक्रोबॅटीक क्रीडा प्रकार असून वसंत विहार शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या अस्मि चोपडेकर आणि तिच्या टीमने केलेले एरियल सिल्कचे सादरीकरण बघून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कौतुक केले.
प्रशिक्षक ओंकार अन्सुरकर, सतिश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माँ गुरूकुल येथे हे प्रशिक्षण अस्मि गेल्या तीन वर्षांपासून घेत असून तिने राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही आत्तापर्यंत सहभाग घेतल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.