ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून आज ५९ रुग्णांची भर पडली तर ठाणे शहरात ३३ रूग्ण सापडले. सक्रिय रुग्णांचा आकडा ४००च्या पुढे गेला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक रूग्णवाढ ठाणे शहरात झाली असून ३३ रुग्णांची भर पडली तर सक्रिय रुग्णांचा आकडा २७२वर गेला आहे. नवी मुंबई येथे १०, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदरमध्ये प्रत्येकी तीन, बदलापूर परिसरात चार, ठाणे ग्रामीण भागात पाच आणि एका रुग्णाची नोंद भिवंडी भागात झाली आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात सात लाख ४८,१६९रूग्ण बाधित सापडले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ४१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आत्तापर्यंत सात लाख ३६,५५२जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ११,९७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.