चैञ नवरौत्सवात फुलणार कला-भक्तीचा मळा

ठाणे: ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवाचे यंदाचे हे सोळावे वर्ष आहे.

नवरात्रोत्सवात सुप्रसिध्द प्रधानाचार्य व यज्ञाचार्य वे. शा. सं. मुकुंदशास्ञी मुळे (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग होणार आहे.
सुप्रसिध्द कलादिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड व नियोजक निनाद धुरी व ओमकार गुरव हे चैत्र नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना दिल्ली येथील अक्षरधाम मंदिराच्या प्रतिकृतीचे दर्शन घडवित आहेत. २४X३६ फुट जागेत देवीचा मुख्य गाभारा उभारण्यात आला आहे. तलावपाळी परिसराला विद्युत रोषणाई करून लेझर शो करण्यात येणार आहे. देवीच्या मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूस गजमुख बसविण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावर सात फूट श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
चित्रनगरीतील शंभरहून अधिक कारागीर अहोरात्र काम करीत आहेत. फायबर, प्लायवूड, कपडा, रंग, ई. वस्तुंचा वापर करुन ही सुंदर कलाकृती साकारण्यात येत आहे.
नरेंद्र बेडेकर आणिआश्विनी कानोलकर यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाची रुपरेखा आखण्यात आली आहे.

बुधवार २२ मार्च रोजी देवीचे आगमन कळवा येथून सकाळी १० वाजता वाजत गाजत होणार आहे. यासाठी ३०० जणांचे लेझीम पथक आणि अन्य कलपथके जय्यत तयारीत आहेत.बुधवारी कोळीगीते आणि नृत्यांचा `दादूस आला रे’ हा कार्यक्रम तसेच कोळी समाजातील मान्यवरांचा सन्मान होणार आहे. गुरुवारी वारकरी किर्तन तसेच वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सन्मान होणार आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय लोकगायक त्रिपाठी आणि गायिका अनन्या सिंग आणि गायिका अनामिका त्रिपाठी यांचा कार्यक्रम तसेच उत्तर भारतीय समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. शनिवारी गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांच्या मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम, बुधवार २९ मार्च २०२३ रोजी कर्तृत्ववान महिलांना `नवदूर्गा’ पुरस्काराने तर कर्तृत्ववान पुरुषांना `नवरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.