नवी मुंबई: वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ बाजारात गुरुवारी मोठ्या प्रमाणात आवक वाढली. मात्र ही आवक वाढल्याने फळ बाजाराबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे परिसरात दुपारपर्यंत वाहतूक कोंडी दिसून आली.
सध्या उन्हाचा पारा चढत असल्याने रसदार फळांची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे एपीएमसी फळ बाजारात कलिंगड, टरबूज, पपई अशा फळांची आवक वाढली आहे. गुरुवारी फळ बाजारात एकूण ४८३ गाड्या आवक झाली होती. यात सर्वाधिक कलिंगडाची आवक होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजार आवारात जागा कमी पडत होती.त्यामुळे बाजार आ बाहेर या गाड्यांची लांबच लांब रांग लागली होती. या रांगेमुळे तुर्भे-वाशी रोडवर तुर्भेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी दिसून आली.