ठाणे महापालिकेच्या ४२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ४२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून पदोन्नती देण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन सहयोगी प्राध्यापक,२१ फिल्डवर्कर, चार उपकार्यालयीन अधीक्षक, चार कनिष्ठ अभियंता, एक सहाय्यक मोटार मॅकॅनिक, आणि १० वरिष्ठ लिपिकांचा समावेश आहे.
फायलेरिया विभागातील २१ फिल्डवर्करला सुपेरीयर पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. चार उपकार्यालयीन अधीक्षकांना कार्यालयीन अधीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. चार कनिष्ठ अभियंत्यांची उपनगर अभियंता पदी वर्णी लावण्यात आली आहे, एकाची सहाय्यक मोटार मेकॅनिकवरून मेकॅनिकपदी तर १० वरिष्ठ लिपिकांची कार्यालयीन अधीक्षक अशा एकूण ४२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
नियमाप्रमाणे तीन वर्ष कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली जाते. मात्र कोरोनाच्या काळात काही महिने पदोन्नती रखडली होती. मात्र आता पदोन्नती देण्यात आली असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातारण आहे.