जलपरी सुखजित कौरचा विश्वविक्रम

कल्याण : डोंबिवलीची जलपरी म्हणून नावलौकिक मिळवलेली सुखजित कौर हिने सलग 14 तास पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर कोरला. 15 ऑगस्ट 2014 रोजी स्मिता काटवे यांनी तयार केलेला 12 तासांचा विक्रम मोडीत काढत सुखजीतने नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केला. तिने हा विक्रम न्यू वायले स्पोर्ट्स क्लब, कल्याण, येथे केला. हा विक्रम तिने वयाच्या 49 व्या वर्षी नोंदवत 1246 लॅप्स (राऊंड) मारले.

हा संपूर्ण प्रयत्न दोन पात्र निरीक्षकांनी पाहिला. या प्रयत्नामुळे तिचे नाव एकाच वेळी सर्वात प्रतिष्ठित इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले.

सुखजीत कौर ही लांब पल्ल्याची जलतरणपटू असून, तिने वॉटरपोलो ट्रायथलॉन आणि व्हॉलीबॉलमध्ये मुंबई विद्यापीठाकडून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या स्मिता काटवेचा नऊ वर्षांचा विक्रमही मोडला. सुखजीतला जादूच्या पुस्तकातून नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिचे नाव कथेसह रेकॉर्ड बुक्समध्ये प्रकाशित झाले आहे.
तिला तिच्या आगामी आंतरराष्ट्रीय इव्हेंट्स, फिना मास्टर्स या स्पर्धेसाठी प्रयोजकाची गरज आहे.

तिच्या इव्हेंट्ससाठी तिला प्रायोजित करण्यासाठी कोणतीही कंपनी पुढे आली तर ती अनेक विक्रम करू शकेल असे तिला वाटते. तसेच पुढेही अनेक विक्रमांना गवसणी घालायची असून यासाठी तिला शासनाचे पाठबळ हवे आहे. पन्नास वर्षापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच लांब पल्याच्या अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवल्यानंतरही शासनाने तिला कुठलाही पुरस्कार किंवा आर्थिक मदत न केल्यामुळे त्याची खंत सुखजीत कौर हिने व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना आतापर्यंत भेटून अनेक वेळा त्यांना विक्रमांबद्दल माहिती दिलेली आहे. त्यांनीही शासनाच्या वतीने नक्कीच दाखल घेऊन आपला गौरव केला जाईल असे आश्वासन दिलेले आहे.. खासदार आणि मुख्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन लवकरात लवकर पूर्ण व्हावे ही इच्छा सुखदेव यांनी बोलून दाखवली.