महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापनदिन आज ठाण्यात संपन्न होत आहे. आगामी काळात श्री. राज ठाकरे पक्षाला नेमकी कोणती दिशा दाखवणार हे यानिमित्त समजेल. महाराष्ट्रातील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर होत असलेला वर्धापन दिन आणि तोही मुख्यमंत्री एकनाथ शिदं े यांच्या अंगणात, हे लक्षात घेतले तर श्री. राज ठाकरे यांच्या भूमिके बद्दल औत्सुक्य वाढणार आहे. शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढण्यात भाजपा आणि शिवसेनेची उभी फू ट कारणीभूत होती. मनसेचे श्री. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबद्दलचे नाते सर्वश्रुत आहे आणि त्यामुळे या सत्तांतरामुळे त्यांना आनंद झाला नसेल तरच नवल. अशा पार्भूमीवर श् श्व री. राज ठाकरे हे स्वतंत्र अस्तित्व ठे वतील की भाजपा-शिदं े शिवसेना गटाबरोबर युती करतील हे वर्धापनदिनानिमित्त आयोजित सभेत समजू शके ल. अगदी स्पष्ट भूमिका घेतली गेली नाही तर त्याबाबत सुतोवाच होईल अशी शक्यता आहे. शिवसेना आणि सेनेशी युती करणारा भाजपा हे मनसेचे राजकीय वैरी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि युती यांच्यात खरा प्रतिस्पर्धी कोण याचा निर्णयही राज ठाकरे यांना घ्यावा लागेल. त्याचे उत्तर दगडापेक्षा वीट मऊ या उक्तीनुसार स्वाभाविक असले तरी जोवर त्याबाबत सुस्पष्टता येत नाही तोवर मनसे कार्यकर्ता निवडणूक ‘मोड’मध्ये येणार नाही. भाजपा-शिदं े यांच्याशी आघाडी के ली तर त्यांच्या वाट्याला किती जागा येतील हा विषय महत्त्वाचा ठरतो. अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या तर मनसे तडजोड करील काय कारण गेल्या खेपेस त्यांनी 288 पैकी 101 जागा लढवल्या होत्या. अर्थात मतदान जेमतेम साडेतीन टक्के झाले होते. त्यामुळे एवढ्या जागा मिळणे कठीण आहे. मुंबई महापालिके तही जागा वाटपाचा पेच निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढवण्यासाठी मनसेला अधिक आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. सरकारमधील दोन्ही घटक पक्षांशी स्नेहाचे संबंध असल्याने त्यांना विरोधी पक्ष म्हणून आक्रमक होता येईल काय, हा प्रश्न आहेच. वास्तविक पाहता राज ठाकरे यांच्यासाठी मनसे हीच ‘खरी’ सेना असल्याचे सिद्ध करण्याची संधी आहे. त्या संधीचे सोने झाले तर गेल्या दोन विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील कामगिरी त्यांना सुधारावी लागणार. २०१९ मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य के ले होते आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरुद्ध विपक्षांची मोट बांधून त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. आता ते भाजपाच्या जवळ गेल्याचे दिसत आहे तर महाविकास आघाडी आणि पर्यायाने शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यापासून दरावले आहेत, या स्थितीत ु ते नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहावे लागेल. दोन शिवसेनांमधील भांडणाचा लाभ घ्यायचा की शिदं े शिवसेनेबरोबर हातमिळवणी करायची हा पूर्णपणे राजकीय निर्णय राज ठाकरे यांना लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बस्तान बसवण्यासाठी पूरक वातावरण तयार झाले असून राज ठाकरे आपल्या इंजिनची पॉवर कोणाला देतात हे पाहावे लागेल. एकटे इंजिन असलेली डब्यांशिवायची गाडी मनसेच्या मतदारांना चालणार नाही. फक्त वाफ दवडण्यापेक्षा प्रत्यक्ष विकासाची स्थानके या गाडीने घ्यावीत ही जनतेची
अपेक्षा असणार आहे. बघुयात राज ठाकरे काय करतात ते !