डोंबिवलीकर शांत का?

डोंबिवलीत झळकलेल्या या फलकावरील मजकू र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सर्वसामान्य डोंबिवलीकरांची निराशा त्यातून प्रकट होत आहे. काय लिहिले आहे या फलकावर : ‘डोंबिवली शहर, अतिसुशिक्षित… नाही कु णास वेळ, फावते सुस्त प्रशासनाचे!’ पुढे असेही नमूद करण्यात आले आहे : येतील निवडणुका, झळकतील आश्वासने…. होतील मेळावे, पण होणार काही नाही! हे फलक डोंबिवलीकरांची वैफल्यग्रस्त अवस्था सिद्ध करते. प्रशासन काही करत नाही हे जुनेच दखणे या मजकु रातून ध्व ु नित होत आहे. फलकाच्या शेवटच्या ओळी वाचून स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काही कार्यवाही करतील ही अपेक्षा आहे. फार भेदक अशा त्या ओळी आहेत : तस्मात् ठेविले प्रशासनाने, तैसेची रहावे, सुविधांची अपेक्षा करू नये! ही निर्वाणीची हतबलता एका रात्रीत तयार झाली नाही. त्यास पालिका स्थापनेपासूनचा मोठा इतिहास आहे. कल्याण डोंबिवलीतील विकासाचे एक चित्र आणि आज ठाणे महानगरपालिके च्या विविध उपक्रमांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणे, हा विरोधाभास डोंबिवलीकरांचे फलकावरील भावनांचे एक प्रकारे अनुमोदन आहे, असेच म्हणावे लागेल. या फलकावरील अस्वस्थेतून प्रशासकीय अकार्यक्षमतेची सल जेवढी दिसते त्यापेक्षा जास्त सल या महापालिके तील सर्वसामान्य जनता या गैरकारभाराविरुद्ध एकत्र येत नाही ही आहे. नागरिकांची ही उदासिनता शहरातील आजच्या केविलवाण्या स्थितीस जबाबदार आहे काय? लोकांची एकजूट नसणे राजकारण्यांच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळे एकीकडे ठाणे आणि दसरीकडे नवी ु मुंबई येथील प्रगती पाहण्याखेरीज सर्वसामान्य डोंबिवलीकरांना पर्याय राहिलेला नाही. विरोधी पक्ष म्हणून दोन्ही काँग्रेसनी वास्तविक सेना-भाजपा युतीला नागरी सुविधांच्या प्रश्नावरून कोंडीत पकडायला हवे होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खड्ड्य ांची वगैरे प्रदर्शने भरवली. पण मनसेकडू न त्यापेक्षा अधिक आक्रमक भूमिका घेतली जाण्याची अपेक्षा होती. तसे झाले नाही आणि त्याचा त्रास सर्वसामान्यांच्या नशिबी आला. मुळात या दोन्ही शहरांमध्ये राहणारे नागरिक चाकरमानी असल्याने त्यांचा सकाळी एकदा काय कामावर गेल्यापासून रात्रीपर्यंत फार संबंध येत नाही. त्यामुळे नागरी आघाडी वगैरे स्थापन झाली नाही. जे प्रयत्न झाले त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. नागरिकांची एकजूट जितकी पाडव्याच्या शोभायात्रेच्या वेळी दिसते, ती एरवी दिसत नाही, हे खेदाने नमूद करावे लागेल. डोंबिवलीकर प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि पापभिरू असल्याने त्याने नेमस्तपणाची चौकट कधी मोडली नाही. जो नाराजीचा सूर उमटे तो घरातल्या घरात चार भिंतींमध्ये आणि प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी परंतु कु जबूजीच्या रूपात. डोंबिवलीकरांच्या संयमाचा फायदा घेतला जात आहे यात वाद नाही. परंतु ती परिस्थिती कु णामुळे तयार झाली याचा विचार डोंबिवलीकर करणार आहेत की नाही?