सुवर्ण महोत्सवी परंपरा असणाऱ्या पक्षाचे नाव आणि चिन्ह रातोरात हातातून जाणे हा धक्का अनपेक्षित नसला तरी तो सहन करण्याची शक्ती कमवायला काही दिवस लागणार. निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. त्याचा निकाल लागेपर्यंत हे वातावरण खदखदत राहणार. आरोप-प्रत्यारोपांच्या फै री झडत राहणार. अपशब्द वापरले जाणार आणि प्रसंगी त्या भांडणांना हिंसेचे गालबोटही लागणार. राजकारणाने खालची पातळी गाठली आहे याबद्दल जनतेचे एकमत झाले आहे आणि त्याचे भान ठे ऊन पुढाऱ्यांनी उरली-सुरली लाज राखण्यासाठी भावनेच्या फार आहारी जाता कामा नये असे वाटते. निवडणूक आयोगाचा निकाल शिवसैनिकांमधील प्रक्षोभ वाढवणार यात वाद नाही. अशा वेळी के वळ संतापाच्या ज्वाळा पेटवत ठे वणे फार शहाणपणाचे ठरणार नाही. उलटप्रसंगी या ज्वाळा विझणार नाही यासाठी संयमाने आणि मुत्सद्दीपणाने मार्ग काढण्याचे मार्गदर्शन श्री. उद्धव ठाकरे आणि पक्षातील बुजुर्ग नेत्यांना करावे लागेल. शिवसेनेसाठी हा
कसोटीचा क्षण आहे. एक प्रकारे अस्तित्वाच्या लढाईचे निर्णायक चरण आहे असे समजले तरी हरकत नाही. अशा वेळी पक्षाचे भवितव्य, त्याची परंपरा, जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आदी बाबींवर काम करावे लागेल. शब्दाने शब्द वाढत जातील आणि हाती काही लागणार नाही, असे होऊ नये असे वाटत असेल तर श्री. ठाकरे
यांनी त्यांच्या काही निकटवर्तीयांना तातडीने मौनाचा मार्ग स्वीकारून त्यामुळे वाचणारी शक्ती पक्षाला संकटातून बाहेर काढण्यासाठी वापरण्याचा सल्ला द्यायला हवा. शिवसेनेला सापळ्यात पकडण्याचा डाव यशस्वी झाला आहे. हा सापळा कोणी रचला यावरून दमत असू ु शके ल. हा सापळा स्वरचित होता असेही बोलले जाते. त्याबद्दल पश्चात्ताप करीत बसण्यात अर्थ नाही. त्यास आता बराच उशीर झाला आहे. मग ज्यांनी तो रचला त्यावर चर्चा होणार की नाही? म्हणजे मूळ मुद्दा बाजूला राहणार नाही. तो गुंता सोडवण्यासाठी जे शांत वातावरण लागते ते निर्माण करण्यासाठी हा व्यर कोलाहल ्थ थांबायला हवा. श्री. उद्धव ठाकरे यांना त्या दृष्टीने आपल्या
अनुयायांना शांत करावे लागेल. प्राप्त परिस्थितीत हे अवघड आहे. परंतु हा पहिला अडसरच त्यांना पुढचे मार्गक्रमण करण्यासाठी उपयोगी ठरेल. भावनांवर भिस्त असलेला हा पक्ष आहे. राजकारणातील डावपेच खेळण्याची कला त्यांना अवगत नाही. बाळासाहेबांची आठवण काढत ते व्याकु ळ झाले आहेत. गदगदलेल्या मनःस्थितीत ते गांगरून गेले नसते तरच नवल. अशा वेळी संयमाने परिस्थिती हाताळणे हेच शहाणपणाचे ठरेल.