देशात बेरोजगारीचा प्रश्न किती गंभीर झाला आहे हे आसाममधील पाच युवकांनी त्यांच्या खेड्यापासून नवी दिल्लीपर्यंत के लेल्या 1500 कि.मी. अंतर पायी प्रवासामुळे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जन्मगावचे (मयुरभंज) हे तरुण आहेत. राष्ट्रपती भेटत नाहीत तोवर ते घरी परतणार नसल्याचे समजते. बेरोजगारीची समस्या आपल्या देशाला वर्षानुवर्षे भेडसावत आहे. त्याची कारणमीमांसा करताना मोठी लोकसंख्या हे कारण सांगितले जात असते. परंतु जे अरतज्ज्ञ आहेत त् ्थ यांना देशातील औद्योगिकीकरणातील त्रुटी आणि एकु णातच रोजगार निर्मितीसाठी लागणारे सर्वसमावेशक धोरणाचा अभाव ही सबब सांगितली जाते. कारण काहीही असो परंतु बेरोजगारी देशातून हटण्याचे नाव घेत नाही ही वस्तुस्थिती आहे. बेरोजगारीची राष्ट्रीय सरासरी 7.7 टक्के आहे. शहरी भागात ती 8.1 टक्के तर ग्रामीण भागात 7.5 टक्के आहे. ज्या आसाममधून ही बेरोजगार तरुण मंडळी पायपीट करीत राजधानीत पोहोचली आहेत, तेथे बेरोजगारीचे प्रमाण तर 16.1 टक्के आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये ती सर्वात कमी म्हणजे 2.4 टक्के इतकीच आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण 5.5 टक्के आहे. बेरोजगारीच्या आकडेवारीतील एक विलक्षण साम्य
असे की दिल्ली आणि आसाम येथील प्रमाण एकच आहे. केंद्र सरकारसाठी बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे आणि तो या तरुणांमुळे चव्हाट्यावरआला आहे. विरोधी पक्ष ज्या मुद्द्यावरून त्यांना नेहमी घेरतात त्या प्रश्नाबाबत सरकारी धोरण काय हा सवाल अशा बातमीमुळे चर्चाविश्वात मूळ धरू शकतो. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपेक्षा या पाच तरुणांचा 47 दिवसांचा पायी प्रवास सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. ही मुले कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा घेऊन आलेली नाहीत. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न राजकारणापलीकडचा आहे, हेही सिद्ध होते. जगण्यासाठी दोन वेळचे भरपेट जेवण, अंगावर वस्त्र आणि निवारा या मूलभूत सुविधांची गरज असते
आणि त्या किमान रोजगार हाती पडला तरच पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक हाताला काम देण्याचे आव्हान सरकारला पेलावे लागेल. अमृत-काळ सुरू असल्याचा बोलबाला आहे. पंतप्रधान त्या दृष्टीने सकारात्मक आहेत. पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी विक्रमी अशी तरतूद अरसं ्थ कल्पात त्यांनी के ली आहे. महामार्गाशी मोठी
शहरे जोडली आहेत, जलदगतीच्या गाड्या सेवेत दाखल होत आहेत. अशावेळी ग्रामीण भागातील लाखो तरुणांना रोजगाराची आशा निर्माण झाली नसेल तरच नवल. त्या लाखो तरुणांचे एक प्रकारे प्रतिनिधीत्व राष्ट्रपतींच्या गावातील पाच तरुणांनी के ले आहे, असेच म्हणावे लागेल.