माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती उत्साहात

ठाणे: कल्पतरू मित्र मंडळ व कल्पतरू महिला बचत गट आयोजित माता रमाई भीमराव आं बेडकर यांची जयंती प्रमुख सल्लागार विशाल वाघ व उषा वाघ यांच्या नेतृत्वाखाली शनिवार 11 फे ब्रुवारी 2023 रोजी रमाबाई आं बेडकर चौक, नागसेन नगर, ठाणे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी महिलांकरिता
संगीत खुर्ची, लहान मुलांचे रेकॉर्डडान्स आणि हळदी-कुं कू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आमदार संजय के ळकर, शेठ नानजी खिमजी ठक्कर, ठाणे नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, समाजसेवक महिंद्र जैन, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेविका नम्रता कोळी, भाई सोनवणे, सचिन चव्हाण, राजेश गाडे, वैभव सोनावणे, आशा खाडे, शशी अग्रवाल, अँड जयश्री शिंदे, बौद्ध पंचायत समिती क्रमांक 247 चे अध्यक्ष लक्ष्मण मोते, रक्षा यादव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उषा वाघ यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त के ले. कार्यक्रमास विशेष सत्कारमूर्ती कु .आर्या गाडेकर (नॅशनल किक बॉक्सिंग गोल्ड मेडलिस्ट) तसेच स्वप्निल कदम (कराटेमध्ये गोल्ड मेडलिस्ट) दोघांचा विशेष सत्कार आमदार संजय के ळकर यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पतरू मित्र मंडळ,संघर्ष महिला मंडळ व संघर्ष मित्र मंडळाच्या सर्व सभासद पदाधिकाऱ्यांनी सहकार्य के ले.