एकीकडे वाचनसंस्कृती लोप पावत असल्याची सार्वत्रिक खंत व्यक्त होत असताना डोंबिवलीच्या पै फ्रें ड्स लायब्ररीनेआयोजित के लेल्या पुस्तक आदानप्रदान उपक्रमात ३५ हजार पुस्तकांचे आदानप्रदान होणे ही निश्चितच दिलासादायक आणि आशा पल्लवित करणारी घटना आहे. डोंबिवलीचा साक्षरतेमधील क्रमांक अव्वल राहिला असून
त्याचेच हे द्योतक आहे, असे म्हणावे लागेल. कोरोना काळात एकु णातच समाजमनावर झालेल्या आघातामुळे माणसाच्या सर्वसामान्य आवडीनिवडी, गरजा, प्राधान्ये यात अमुलाग्र फरक झाला होता. एक जबरदस्त विषण्णता पसरल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर त्याचे खोलवर व्रण उमटले होते. जगण्यावरील विश्वास उडावा अशा दःखदायक ु घटनांनी सकाळ उजाडत होती आणि रात्री डोळ्याला डोळा लागणे बंद झाले होते. वाचनासाठी लागणारी बैठक माणसे गमावून बसली होती. कोरोनाचे निमित्त खरे होते, परंतु त्याही आधी करमणुकीची खूप साधने जनतेला उपलब्ध झाल्याने वाचनसंस्कृतीवर परिणाम झाला होता. छोट्या पडद्यावरील मालिका, ओटीटीसारखे झपाट्याने लोकप्रिय झालेले व्यासपीठ, खेडोपाडी मल्टिप्लेक्सचे पेव फु टणे आदी प्रकारांमुळे माणसाच्या हातून पुस्तक कधी निसटले हेच कोणाला कळले नाही. इतके च काय दररोजचेवर्तमानपत्र वाचण्याची सवय तुटली आणि एके काळी घरात अवघ्या कु टुंबाला ज्ञान आणि मनोरंजनाचे खाद्य पुरविणारे मासिकही
गायब झाले. अशा या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत आदानप्रदान योजनेचे आक्रितच घडले असे म्हणावे लागेल. त्यासाठी पै कु टुंबियांचे कौतुक आणि अभिनंदन करायला हवे. डोंबिवलीच्या सांस्कृतिक वातावरणाला पूरक अशी ही घटना आहे आणि तिचे अन्य शहरांमध्ये अनुकरण व्हावे ही अपेक्षा. आर्थिक सुबत्तेबरोबर मनाची श्रीमंती वाढवण्यासाठी प्रयत्न क्वचितच होताना दिसतात. शहरातील मॉलचेरस्ते सर्वांना ठाऊक असतात परंतु ग्रंथालयाचे साधे नावही अनेकांच्या ओठांवर नसते. घरात दरमहा एखादेपुस्तक विकत घेतले जावे किं वा किमानपक्षी ग्रंथालयाचे सदस्य होऊन पुस्तकांशी दोस्ती करावी असे वाटणाऱ्या कु टुंबांची संख्या रोडावली आहे. ग्रंथालयेओस पडलेली दिसणे हे चिंतेचे कारण ठरू शकते. माणसेभौतिक आनंदात मग्न आहेत परंतु पुढची पिढी अधिक सक्षम, परिपक्व आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ व्हावी असे कोणाला वाटत नाही. पुस्तक आदानप्रदान योजनेमुळे ही बाब अधोरेखित झाली आहे.