सीआयई बोर्ड बंद केल्याने पोदार शाळेबाहेर पालकांचा रस्ता रोको

कल्याण : कल्याणमध्ये पोदार शाळेच्या आवारात पालकांनी गोंधळ घातला. शाळेने सीआयई बोर्ड बंद केल्याने शाळेबाहेर रस्ता रोको करत निषेध व्यक्त केला. तर पालकांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया शाळा प्रशासनाने दिली.

कल्याण पश्चिमेकडील पोदार इंटरनशनल स्कूलच्या कल्याण शाखेत चालविली जाणारे सीआयई बोर्ड बंद करण्याचा शाळा प्रशासनाचा निर्णय ऐकताच पालकांसह विद्यार्थ्याच्या पायाखालची वाळू सरकली. सोमवारी सकाळी पालकांना सोशल मिडीयावर मेसेज पाठवून मिटिंगसाठी बोलावून घेतले व पालकांसमोर हे बोर्ड बंद केले जात असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र शाळेची फी भरताना कोणत्याही प्रकारे तडजोड न करणाऱ्या आपल्या विद्यार्थ्याच्या आयुष्याशी शाळा प्रशासन खेळ करत असल्याचा आरोप करत पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. काही पालकांनी शाळेबाहेरील रस्त्यावर बसून शाळेचा निषेध नोंदवला.

याबाबत शाळा प्रशासनाने सीआयई बोर्ड बंद करण्याचा निर्णय घेतलाय पालकांचे म्हणणे ऐकून घेतला आहे. याबाबत मीटिंग ठेवण्यात आली आहे तेव्हा शाळा प्रशासनाचे पदाधिकारी व पालक मिळून तोडगा काढण्यात येईल. शाळा बंद होणार नाही शाळा सुरूच राहील असे सांगण्यात आले.

कल्याणातील पोदार शाळेत मागील काही वर्षापासून सुरु असलेले सीआयई बोर्ड बंद करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला असून पालकांना शाळेत बोलावून याची माहिती देण्यात आली. मात्र यामुळे हवालदिल झालेल्या पालकांनी शाळेत गोंधळ घालत प्रशासनाने हा एकतर्फी घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली. शाळेच्या प्रवेशद्वारावर पालकांनी गर्दी केली होती. आपल्याकडून भरमसाठ फी आकारली जाते मात्र आता बोर्ड बंद करण्याचा निर्णय घेत शाळेने २० टक्के फीचा परतावा देण्याची तयारी दाखविली आहे.

मात्र आम्हाला पैसे नकोत तर शिक्षण हवे असल्याचे सांगतानाच आमच्या मुलावर होणार्या अन्याया विरोधात सर्व शाखामधील पालकांनी पाठिबा देत शाळा प्रशासनाला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडावे, अशी मागणी त्रस्त पालकांनी केली.

शाळा प्रशासनाने पालकांचे म्हणणे ऐकून घेतले असून याबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. शाळा प्रशासनाचे पदाधिकारी आणि पालक मिळून यावर तोडगा काढण्यात येईल. शाळा बंद होणार नाही शाळा सुरूच राहील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.