ठाण्यात रस्ते सुरक्षा अभियान सुर
ठाणे : ‘अपघातातील मृत्यूचे प्रमाण हे शून्यावर आणायचे आहे. वाहतुकीचे नियम मोडण्यासाठी नसून ते पाळण्यासाठी आहेत. नियम पाळणे हे सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे.त्याचे पालन के ले तरच अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी के ले.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागामार्फत 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ श्री. शिनगारे यांच्या हस्ते 11 जानेवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. टिपटॉप प्लाझा सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला ठाणे शहर सह-पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, ठाणे गुन् शाखेचे अ हे तिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, ठाणे पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.पंजाबराव उगले, ठाणे पूर्व अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय शिंदे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकु मार राठोड व वरिष्ठ अधिकारी व पोलीस उपस्थित होते. ठाणे वाहतूक विभागाचा ब्रँड अॅम्बॅसेडर मंगेश देसाई यावेळी उपस्थित होते. वाहतूक पोलिसांकडून देण्यात येणा-या निर्देशांचे प्रत्येक चालकाने पालन के लेच पाहिजे, असे आवाहन अभनेत्री मधुराणी गोखले- प्रभुलकर यांनी यावेळी के ले.
‘आपली मानसिकता व स्टेट्स सिं बॉलमुळे नियम पाळत नाही. त्यासाठी मानसिकता सुजाण झाली पाहिजे. ती एकट्याची जबाबदारी नाही. वाहतुकीचे नियम पाळले तरच अपघात होणार नाहीत. जिल्ह्यात २०० ते २५० अपघात झाले असल्यामुळे नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. जिल्ह्यात ‘ब्लॅक स्पॉट’ दिसता कामा नये. अपघात टाळण्यासाठीच आपण प्रयत्न करत असून, वाहतूक पोलिसांनीही समाजप्रबोधन करत रहावे, असे आवाहन श्री. शिनगारे यांनी यावेळी के ले.
अपघातात एखादी व्यक्ती दगावते, तेव्हा तिच्या संपूर्ण कु टुंबावर मोठा आघात होतो. नियम धुडकावण्याची वृत्ती, तो पाळण्यापेक्षा मोडण्यात पुरुषार्थ, दस-याला मागे ु
टाकू न पुढे कसे जाता येईल असे विचार यामुळे रस्त्यावर अपघात होतात. घरातील कमवणारी एक व्यक्ती अपघातात मृत्मुखी पडली तर संपू यू र्ण परिवार विस्कळित होतो. चालकाकडे एकाग्रता, चिकाटी, संयम, असे अनेक गुण अपेक्षित आहेत.
यावेळी मोराळे, श्री. उगले, श्री. शिंदे व श्री. राठोड यांनी मनोगत व्यक्त के ले. यावेळी ठाणे वाहतूक विभागाने प्रकाशिक के लेल्या दिनदर्शिके चे प्रकाशन करण्यात आले. तसेच ठाण्यातील रस्ते सुरक्षा बाबतीत उल्लेखनीय कामगिरी के लेल्या कर्मचारी व नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी वाहन सुरळीत चालवण्यासंबंधी उपस्थितांना वाहतूक शपथ देण्यात आली.