डोंबिवलीत गोकुळ दुधात भेसळ?

एफडीएचे स्थानिक अधिकारी आज चौकशी करणार

ठाणे : गेल्या सहा-सात दिवसांपासून डोंबिवलीमध्ये पुरवठा होणारे गोकुळ दुध खराब दर्जाचे असल्यामुळे स्थानिक रहिवासी हवालदिल झाले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे स्थानिक सहाय्यक आयुक्त व्ही.एच. चव्हाण यांना ही माहिती मिळाल्यानंतर उद्या याबाबत चौकशी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुधात भसळ होत असल्याचे समजल्यावर याबाबत काही सतर्क रहिवाशांनी आवाज उठवला आणि दुधाची पॅकेटस् घेण्याचे नाकारले. मात्र ही बाब गंभीर असल्यामुळे सतर्क नागरिकांनी ‘अलर्ट सिटिझन्स फोरम’चे दयानंद नेने यांना सांगितली. त्यांनी या घटनेतील गंभारता लक्षात घेऊन याबद्दल अन्न व औषध प्रशासनाच्या कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख, ठाणे पोलीस यांच्याशी संपर्क साधला.

‘डोंबिवलीमध्ये पुरवठा होणारे गोकुळ दुध गेल्या सहा-सात दिवसांपासून खराब दर्जाचे येत आहे. पूर्ण चौकशी केल्यानंतर निदर्शनास आले की या दुधाच्या पॅकेटमध्ये भेसळ केली आहे. चार कॉर्नरमधून तीन कॉर्नर व्यवस्थित आहेत. एका कॉर्नरची शेप सिलिंग वेगळी आहे हेही कळते. पिशवीच्या बॉटमचे आणि टॉपचे सील यामध्ये दोन्ही कोपऱ्यांवर फरक आहे. डोंबिवलीच्या भोपर नांदिवलीच्या शंकेश्वर नगरच्या सगळ्या दुकानांमध्ये असे भेसळयुक्त दुध विकले जात आहे. यावर योग्य ती कारवाई करावी, अशी ‘ट्विट’ मागणी नेने यांनी केली आहे.

सह-आयुक्त सुरेश देशमुख यांनी याचे गांभीर्य पाहून डोंंबिवलीतील एफडीएचे सहाय्यक आयुक्त चव्हाण यांना याचा त्वरीत तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र शुक्रवारी ‘त्या’दुधाच्या पिशव्या उपलब्ध नव्हत्या. मात्र याची चौकशी शनिवारी करणार आहे, असे चव्हाण म्हणाले.