भाईंदर: मागील सुमारे दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला तरी शहरातील अनधिकृत बांधकाम विरोधात पालिका आयुक्त कारवाई करीत नसल्याने संतप्त झालेल्या नानासाहेब कुळेकर या आंदोलनकर्त्याने शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या वाहनावर दांडक्याने हल्ला करुन वाहनाच्या काचा फोडल्या.
नानासाहेब कुळेकर असे आंदोलकाचे नाव आहे. समोरच असलेल्या विरार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी हल्ला करणाऱ्या कुवळेकरला ताब्यात घेऊन शासकीय मालमत्ता नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.