सलग तीन दिवस जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रुग्ण शून्य

ठाणे : जगात कोरोनाचा कहर वाढत असताना मागील तीन दिवस जिल्ह्यात एकाही नवीन कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. तीन महापालिका आणि ठाणे ग्रामिण भागात शून्य सक्रीय रूग्ण आहेत.

जिल्ह्यातील कुठल्याही महापालिका, नगरपालिका आणि ठाणे ग्रामिण परिसरात एकही नवीन रूग्ण सापडला नाही. कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि मीरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामिण भागात एकही सक्रिय रूग्ण घरी किंवा रुग्णालयात उपचार घेत नाही. ठाण्यात पाच, नवी मुंबई येथे दोन, उल्हासनगर आणि बदलापूर येथे प्रत्येकी एक असे जिल्ह्यात नऊ सक्रिय रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात आत्तापर्यंत सात लाख ४७,४००जण बाधित सापडले आहेत तर आत्तापर्यंत सात लाख ३६,१९० रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ११,९६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.