उल्हासनगर : उल्हासनगर मनपा क्षेत्रात सात गोवरचे रुग्ण आढळल्याची माहिती मनपाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार गोवर साथरोगावर उल्हासनगर मनपाद्वारे विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. या अंतर्गत सुरू असलेल्या तपासणीत 1 जानेवारी 2023 पर्यंत 101 संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 94 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यात सात रुग्णांना गोवर झाल्याचे निदान झाले.
1 जानेवारी 2023 पर्यंत 105 विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये एकुण 5889 लाभार्थ्यांना गोवर रुबेला लस देण्यात आली. सर्व्हेक्षण करण्यात आलेल्या घरांपैकी एकूण 1987 लाभार्थ्यांना व्हिटॅमिन ए चे डोस देण्यात आले असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिली आहे.