बघता-बघता 2022 हे वर्ष संपले. कोरोनातून सावरण्यात सरत्या वर्षाचा अर्धाअधिक काळ गेला आणि मग परिस्थिती पूर्वपदावर येत असताना देशातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील राजकारणाने जनतेला घेरले. कोरोनामुळे मेटाकु टीला आलेली जनता राजकारणाच्या खाली चाललेल्या पातळीमुळे त्रस्त झाली. कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षणासाठी नागरिकांना मुखपट्टी बांधण्याची सक्ती होतीच, आता राजकारणाच्या विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी मुखपट्टी वापरण्याचा निर्णय घेतला असेल तर तो दर्ुदैवी आहे. या मुखपट्टीमुळे जनतेचा आक्रोश आतल्या आत घुमत राहील आणि तो आपल्या ‘माय-बाप’ नेत्यांच्या कानावर पडणार नाही, याचे भान ठे वावे
लागेल. 2023 साली देशातील नऊ राज्यांच्या निवडणुकीप्रमाणे ठाणे-मुंबई आदी महापालिका निवडणुका होणार आहेत आणि अशा वेळी मुखपट्टी झुगारुन जनतेने व्यक्त व्हायला हवे. राजकारणाबद्दल बोलणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे, अशी जनतेची धारणा झाली आहे. या पार्श्वभूमीचा आगामी काळात होणार्या
निवडणुकांवर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. नेत्यांबद्दल असलेल्या आशांना त्यातील मूठमाती देण्याचे ठरवल्यावर आणखी काय होणार? नैतिकता वगैरे यांना सोडचिठ्ठी देणारे राजकारणी या क्षेत्राकडे अर्थार्जनाचे साधन म्हणून पहात आहेत. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजना असो की औद्योगिक जमिनींचे निवास
वापाराकरिताचे रुपांतर असो, यावरुन सध्या जे आरोप होत आहेत, ते पहाता चांगल्या योजनांचा कसा बट्ट्याबोळ आपले राज्यकर्ते करतात हेच सिद्ध होते. एकीकडे गोरगरीबांना हक्काचे घर देण्याची भाषा करायची आणि दसर ु ीकडे बिल्डरबरोबर साटेलोटे करुन प्रकल्पाबद्दल संशयाचे वातावरण निर्माण करायचे ही कोणती रीत झाली. राज्यातील उद्योग स्थलांतरित होतात म्हणून ऊर बडवायचे आणि औद्योगिक जमिनी विकासकांना आंदण द्यायच्या हा विरोधाभास आजची राजकीय नीती झाली आहे. अशा वेळी तोंडावरची मुखपट्टी बाजूला करुन आपण निषेध नोंदवणार आहोत की अशा गैरप्रकारांना मूक-संमती देणार आहोत? नवीन वर्षात या जुन्या आणि सहिष्णू सवयीचा त्याग करुन आपली भूमिका आग्रहीपणाने मांडण्याचा संकल्प प्रत्येक नागरिकाने सोडायला हवा. कोरोनापासून मुखपट्टी ‘ओके ‘, परंतु राजकारणातील थेरांविरुध्द ती काढायलाच हवी. नव्या वर्षात तुमच्या आत्मविश्वासाला नवीन धुमारे फु टोत हीच शुभेच्छा!