कस्टम विभागाची मोठी कारवाई
मुंबई : कस्टम झोन तीनकडून आज जवळपास 538 कोटींचं 140 किलो ड्रग्ज नष्ट करण्यात आले. नवी मुंबईतील तळोजा येथे दुपारी 12 वाजता हे ड्रग्ज नष्ट करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी आणलेले आणि कारवाईत जप्त केलेले जवळपास 538 कोटींचे 140 किलो ड्रग्स मुंबई कस्टम झोन तीनने नष्ट केले.
मुंबई कस्टम विभागाच्या वतीने तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या ठिकाणी हे ड्रग्स नष्ट करण्यात आले. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी ड्रग्स विक्रीत सक्रिय असणाऱ्या टोळ्यांवर कस्टम विभागातर्फे कारवाई करण्यात येते. या कारवाई दरम्यान जप्त केलेले ड्रग्स आज नष्ट करण्यात आले. मुंबई कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे ड्रग्स नष्ट करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तसेच शहरातील इतर ठिकाणी केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेले 538 कोटी रुपयांचे 140 किलोग्राम ड्रग्ज सीमा शुल्क विभागाने नष्ट केले. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये 56.06 किलो हेरॉईन आणि 33.81 किलो चरसचा समावेश आहे. याबरोबरच मुंबई विमानतळवरुन वेगवेगळ्या 14 प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा देखील समावेश आहे.
कस्टम विभागाकडून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारुन अंमली पदार्थ जप्त करण्यात येते. वर्षभर करण्यात आलेल्या कारवाईतील हे सर्व अंमली पदार्थ एका ठिकाणी साठवले जाते. त्यानंतर साठवलेले हे अंमली पदार्थ परिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने डिस्पोजल कमिटीच्या उपस्थितीत जाळून नष्ट करण्यात येते. अशी कारवाई आज नवी मुंबईतील तळोजा येथे करून 140 किलो ड्रग्ज नष्ट करण्यात आलं. या ड्रग्जची किंमत जवळपास 538 कोटी रूपये एवढी आहे.