नुकताच हेनली अँ ड पार्टनरने एक धक् ्स कादायक अहवाल सादर के ला आहे. त्यानुसार मागील वर्षी आठ हजार कोट्यधीश लोक भारत सोडून विदेशात राहायला गेले आहेत. देश सोडून जाणाऱ्या कोट्यधीशांमध् भारताचा ये तिसरा क्रमांक लागतो. यात पहिल्या स्थानावर रशिया आहे. रशियातील 14 हजार लोकांनी पलायन के ले आहे. त्यांनतर चीनचा दसु रा क्रमांक लागतो. चीनमधील 10 हजार नागरिकांनी पलायन के ले आहे. आपला देश सोडून जाणाऱ्यांची पहिली पसंती संयुक्त अरब अमिराती
(यूएई), ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरला आहे. भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचे पालन करणाऱ्या भारताने साडे सात दशके अखंडित लोकशाही परंपरा सांभाळली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले आहे. देशातील प्रत्क ये नागरीक कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या आवडीचा व्यवसाय करू शकतात. आज जगभरातील देशांमध्ये आर्थिक पडझड सुरू असताना भारत हा वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आला आहे. असे असताना आपल्या देशातील धनदांडगे लोक विदेशात जाऊन स्थायिक होत असतील तर ती निश्चितच चिंताजनक बाब आहे. खरे तर आपल्या देशात जीवनस्तर अजूनही कनिष्ठ पातळीवर आहे. पायाभुत सुविधांचा विकास अद्यापही फारसा झालेला नाहीये. सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमर्गीय यांना त्याचे फारसे गैर वाटत नाही. त्यांच्या तक्रारी निश्चित
असतात; पण तरीही रोजचा संघर्ष करून ते निभावून नेतात. परंतु अतिश्रीमंत, धनदांडग्यांचे तसे नसते. त्यांची स्वप्, मानस ने िकता ही सामान्यांपेक्षा वेगळी असते. संपूर्ण आयुष्य छानछौकीत, आलिशानपणातच जगायचे ही त्यांची धारणा असते. त्यादृष्टीने त्यांना भारत मागासलेला वाटतो. याउलट संयुक्त अरब आमिरातीचे उदाहरण घेतल्यास हा देश भलेही मुस्लीमबहुल असला तरी तेथील जीवनस्तर भारतापेक्षा उंचावलेला आहे. आधुनिक आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या देशाने नागरीकांचे जीवन सुखकर बनवले आहे. याची भुरळ धनदांडग्यांना न पडती तरच नवल ! याशिवाय आपल्या देशात फोफावलेला भ्रष्टाचार आणि संघटित गुन्गारी यामुळेही अनेक धनवान हे लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. आपल्याकडे एखाद्या कारकु नालाही एखाद्याच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवण्याचे अधिकार आहेत. कायद्यांना मनमानीपणाने वाकवून धनसंपत्ती कमावलेल्या या धनदांडग्यांना याची भीती वाटत असते. याखेरीज वेळोवळी बदलणारी सरकारे आणि त्यांची काम करण्याची पद्धत याचाही त्यांना त्रास वाटतो. राजकीय पक्ष, नेतेमंडळी, अधिकारी यांच्याकडून देणगीच्या नावाखाली मोठी रक्कम प्रत्क मह ये िन्याला धनवानांकडून लुटली जाते. याचा कोणताही ताळेबंद नसतो. अशा अनेक अडथळ्यांना पार करण्यापेक्षा दसु ऱ्या देशात जाऊन राहणे अधिक योग्य, अशी या लक्ष्मीपतींची मानसिकता बनते. भलेही अधिक पैसे खर्च होतील, मात्र यामुळे व्यवसायात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. संपूर्ण कुटुंबही सुरक्षित राहील, आलिशान जीवन जगता येईल. हेच विचार त्यांना भारतापासून दर घेऊन जातात. ही ू सर्व कारणे सकृ तदर्शनी दिसणारी आहेत. आजघडीला आपल्या देशात 3.75 लाख लोक कोट्यधीश आहेत. याचा अर्थ हे लोक हाय नेटवर्थ असणारे आहेत. कारणे काहीही असोत आणि व्यक्ती श्रीमंत असो, अतिश्रीमंत असो वा गरीब; त्याला आपल्या देशात राहणे योग्य
वाटत नसेल तर सर्वार्थाने व्यवस्चे अपयश आहे. थे महात्मा गांधींनीही लोकशाहीबाबत बोलताना असे म्हटले होते की, 99 टक्के लोकांचे एकमत असेल आणि एक टक्का लोकांचे मत वेगळे असेल; तर मी त्या एक टक्का लोकांचे म्हणणे ऐकू न घेईन. हीच खरी लोकशाही आहे. त्यानुसार देश सोडून जाणाऱ्या धनिकांची बाजू ऐकू न घेतली पाहिजे आणि त्यानुसार बदल के ले गेले पाहिजेत. कारण त्यांच्या स्थलांतरामुळे देशातील संपत्तीसद्धा ु बाहेर जात असते.