ठाणे शहर आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेला जिल्हा म्हणून अशी घसघशीत तरतुद झाली असा अर्थ काढला जात आहे. या टीके ला तसा अर्थ नाही कारण ज्या ठाणे जिल्ह्याने, खास करुन एमएमआरडीए क्त्षे रात महानगर मुंबईचा नागरीकरणाचा भार हलका के ला तिथे पायाभूत सुविधा देणे गरजेचे होते. किं बहुना या सर्व परिसरात विकासाचा मोठा अनुशेष असून मुख्यमंत्र्यांनी तो एक प्रकारे कमी के ला आहे. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना ठाणे जिल्ह्याला अशी मदत करायचे सुचले नव्हते, या येथील जनतेच्या कै फियतीची दखल घेतली गेली आहे. देशाच्या वाणिज्य राजधानी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था हवी असते. जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्याला कच्चा माल पुरवठा करणे असो की तयार उत्पादने देशात वा परदेशात पाठवण्याचा विषय असो वाहतूक व्यवस्था सुरळित
असावी ही अपेक्षा असते. शहरांना जोडणारे पूल, रुंद रस्, संभाव्य न ते व्या मार्गांची आखणी करणे, सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे असे विकासाला पोषक पर्यावरण तयार करण्यासाठी पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. श्री. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने या दर्ल ु क्षित मुद्द्याकडे शासनाचे लक्ष गेले आहे. त्याचे स्वागत करायला हवे. दोन हजार कोटी रुपयांचा परिणामकारक फायदा जनतेला मिळाला तर त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधरु शकतो. उपनगरी रेल्वेक्षमतेच्या बाहेर
प्रवाशांची ने-आण करीत आहे, सार्वजनिक बस वाहतूक कमालीची अपुरी ठरत आहे, मागणी आणि पुरवठा यांचे प्रमाण इतके व्यस्त आहे की सर्वसामान्य माणसांना बसथांब्यांवर ताटकळत उभे राहणे किं वा रिक्षा याखेरीज विकल्प राहिलेला नाही. सार्वजनिक वाहतुकीचे तीन तेरा वाजण्यामागे अकार्यक्षम व्यवस्था हे कारण असले तरी कोणत्याच महापालिके कडे तितके आर्थिक बळ नाही की जे हा गाडा वाहू शकतील. यामुळे गेल्या काही वर्षात खाजगी वाहनांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे कितीही पूल बांधा वा रस्ते रुंद करा, वाहतूक कोंडीतून शहरांची मुक्तता होत नाही. दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांना आमची एकच विनंती आहे की त्यांनी यापैकी दहा टक्के रक्कम सार्वजनिक परिवहन उपक्रम सक्षम करण्यासाठी वापरावी. तसे झाले तरच वाहतूक व्यवस्था खऱ्या अर्थाने बळकट होईल.