ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढ थांबली असून आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. जिल्ह्यात फक्त १२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महापालिका, नगरपालिका आणि ठाणे ग्रामिण परिसरात एकही रूग्ण सापडला नाही. जिल्ह्यात आत्तापर्यंत सात लाख ४७,३८३जण बाधित सापडले आहेत तर सात लाख ३६,१७० रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णालयात आणि घरी १२जणांवर उपचार सुरू आहेत. ठाणे शहरात अवघे तीन रूग्ण सक्रिय राहिले आहेत. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथे एकही सक्रिय रूग्ण नाही. आत्तापर्यंत ११९६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.