कामात हलगर्जीपणा करणारे कर्मचारी आणि कामाच्या दर्ज्याबाबत बेफिकीरी करणारे ठे के दार सध्या ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या रडारवर आले असून त्यांनी कायदेशीर कारवाई सुरु के ली आहे. महापालिके च्या कारभारातील अनागोंदी हा सर्वत्र चर्चेचा विषय असला तरी त्याविरुध्द कारवाईचे आसुड अपवादानेच ओढले गेले. यामुळे महापालिके त शिस्त येईल अशी अपेक्षा आहे. श्री. बांगर गेल्या काही दिवसांपासून नागरी कामांचे जातीने निरीक्षण करीत आहेत. अचानक भेट
देऊन पालिका कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेत आहेत. यामुळे पालिके तील कामचुकार कर्मचाऱ्यांवर अं कु श बसेल आणि अप्रामाणिक ठे के दारांना वेसण बसेल ही अपेक्षा आहे. विषय स्वच्छतेचा असो की एखाद्या रेंगाळलेल्या कामाचा, महापालिके ची प्रतिमा त्यामुळे खराब होत असते. एकीकडे स्वच्छ शहराचा पुरस्कार घ्यायचा आणि नाक्यानाक्यांवर कचऱ्याचे ढीग वाढत ठे वायचे, या विसंगतीबद्दल नागरिकांमध्ये नेहमीच चर्चा सुरू असे. आयुक्तांना त्याचा अं दाज आला असावा आणि त्यामुळे
त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असावा. महापालिके ची प्रतिमा बिघडणे म्हणजे आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर नाराजी निर्माण होण्यासारखे असते. दर्देुवाने फार कमी आयुक्त अशा नाराजीची दखल घेत असल्याचे ठाणेकरांनी पाहिले. श्री. बांगर यांनी मात्र आयुक्तांची ही प्रतिमा बदलण्याचा निश्चय के लेला दिसतो. शहरात अनेक प्रश्न वर्षानुवर्षेप्रलंबित आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ठाणे परिवहन सेवेचा. आम्ही आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी एकदा या समितीच्या कामाचा लेखाजोखा घ्यावाच. विद्यमान सभापती विलास जोशी यांना परिवहन उपक्रम सुधारायचा आहे. त्यांना काही निवडक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची साथही आहे. परंतु एकु णातच परिवहनचा कारभार ढिसाळ झाला आहे. नादुरुस्त बसेस, कर्मचाऱ्यांमध्ये आलेली शिथीलता, काही प्रमाणात बेशिस्त आणि या सर्व अकार्यक्षमतेचे कारण
डबघाईला आलेली आर्थिक स्थिती अशी सबब सांगून परिवहनचा कारभार सुधारताना दिसत नाही. श्री. बांगर यांनी लक्ष घातले तर या उपक्रमात धुगधुगी येऊ शके ल.
दसरा ु ऱ्यांफे रीवाल्यांचा आहे. याबाबत महापालिके चे निश्चित धोरण नाही आणि जे आहे ते अं मलात आलेले नाही. हा प्रश्न जटिल होत चालला आहे. एकीकडे
फे रीवाल्यांकडे मानवतावादी दृष्टीकोनातून पाहिले जावे हा राजकीय आग्रह तर दसरीकडे र ु स्ते अडल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यात भरडला जाणारा
सर्वसामान्य माणसू, या आघाडीवर आयुक्तांनी लक्ष घातले तर शहरात बोकाळलेली अनागोंदी कमी होऊ शके ल. बेकायदा पार्किं ग ही समस्याही प्रशासनाची वाट पहात आहे. रस्ता रुंदीकरणाची जुनी कामे अर्धवट अवस्थेत आयुक्तांच्या हस्तक्षेपाची वाट पहात आहेत. पोखरण रोड नं. 2 हे त्याचे उदाहरण. करदात्या ठाणेकराला आपल्या पैशाचा मोबदला मिळायला हवा. श्री. बांगर यांचे त्याबाबत दमत नाही. हे त ु ्यांच्या तत्परतेवरुन दिसते. त्यांचा हा पवित्रा शहराला पुन्हा वळणावर आणेल ही अपेक्षा.