दिल्ली महापालिका आणि हिमाचल प्रदेश राज्यातील निवडणुकीत पराभवाला सामोरे जाणारी भाजपा खचेल असे राजकीय निरीक्षक आणि विरोधी पक्षांना वाटत असताना गुजरातची 54 टक्के जनता त्यांच्या मदतीला धावून आली आणि या दहेर ु ी पराभवाचे द:ख ु हिवाळी धुक्याप्रमाणे गुजरातमध्ये उगवलेल्या विजय-सूर्याने दर के ू ले. अर्थात भाजपातर्फे गुजरातच्या यशाचे मोठे भांडवल केले जाणार यात वाद नसला तरी अंगावरील गुलाल कायम कसा राहील यासाठी पक्षाच्या नेत्यांना तातडीने चिंतन करावे लागणार. निवडणुकांच्या वेळापत्रकात हवा तसा बदल करुन विरोधी पक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपाने केला असा आक्षेप सुरुवातीपासूनच नोंदवला गेला. दिल्ली महापालिके चे त्रिभाजन रद्द करणे आणि निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलणे म्हणजे रडीचा डाव आहे अशी टीके ची झोड उठवून ‘आप’ने जनतेची सहानुभूती मिळवली. ‘आप’च्या नेत्यांना गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील प्रचारात गुंतवून ठेवून महापालिके त कमळ फुलवण्याचा भाजपाचा कथित डाव उधळला गेला. पंजाब पाठोपाठ गुजरातमध्ये सत्तेचे स्वप्न पहाणाऱ्या ‘आप’च्या हाती जेमतेम 13 टक्के मतदान पडले. एक मात्र नक्की की त्यामुळे काँग्रेसपेक्षा ‘आप’ हाच भाजपाला आगामी काळात डोकेदखु ी ठरेल असा तर्क काढला जाऊ शकतो. गुजरातच्या अभूतपूर्व यशामागे ‘मोदी-मॅजिक’ होते यात वाद नाही. 1995 पासून सुरु झालेली ही विजययात्रा आता तीन दशकांपुढे सुरु रहाणार आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाला त्यांच्या होम-पिचवर निर्विवाद मान्यता मिळाली आहे. ‘गुजरात -मॉडेल’चे नाणे आजही खणखणीत आहे यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. ‘आप’ला मिळालेले ‘यश’ तुलनेने संख्यात्मक दृष्टया काँग्रेसपेक्षा कमी असले तरी मोदींच्या इलाक्यात चंचुप्रवेश के ल्याचे त्यांना समाधान देऊन जाणारे आहे. तुलनेने काँग्रेसला जागा अधिक आहेत. परंतु राष्ट्रीय पक्ष म्हणून लौकिक असताना त्या ‘आप’ पेक्षा कमीच आहेत. राहुल गांधी ‘भारत-जोडो’च्या निमित्ताने परिश्रम करीत असताना त्यांच्या पायपीटीचे काँग्रेस मतांत रुपांतर झालेले दिसत नाही. याचा अर्थ मतदार भवनांपेक्षा ठोस विकासाला महत्त्व देत असतो. अर्थात गुजरातच्या यशोगाथेची महाराष्ट्राला झळ बसली आहे आणि त्यामुळे गुजरातच्या यशाची पुनर्रावृत्ती महाराष्ट्रात होण्यासाठी यापुढे मोठे प्रकल्प तेथे नेण्याचा मोह भाजपा नेत्यांना टाळावा लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक प्रश्नांवर मतदान होत असते. दिल्लीत भाजपाची सत्ता असली तरी महापालिके त त्यांना संधी मिळालेली नाही. या न्यायाने राज्याचा विकास हा कें द्रबिंद मा ू नला तर महाराष्ट्रात आगामी काळात भाजपाला जनतेची मने जिंकावी लागतील. हिमाचल प्रदेशने काँग्रेसला कौल देऊन पक्षात धुगधुगी निर्माण केली आहे. श्री. राहुल गांधी यांच्या ‘भारत-जोडो’ यात्रेचा परिणाम होता असे म्हणता येणार नाही. परंतु राहुल यांचा उत्साह वाढवण्यासाठी हा विजय उपयुक्त ठरु शकेल. गुजरातच्या निकालाचे एकतर्फीपण 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारे आहे. त्यादृष्टीने विरोधी पक्षांना एका नव्या व्युहरचनेचा विचार करुन मुकाबला करण्याची तयारी करावी लागेल. एक महापालिका, भले राजधानीतील का असेना आणि एक छोटे राज्य (गुजरातच्या तुलनेत) गमावल्याचे दःख म्ह ु णूनच भाजपा करणार नाही. त्यांची नजर आता आगामी नऊ राज्यांतील निवडणुकांकडे आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीकडे असणार !