ठाणे : नुकत्याच गुवाहाटी आसाम येथे पार पडलेल्या ज्युनिअर अॅथलेटिक्स ऑल इंडिया फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याची कुमारी ईवा मनोज हिने १६ वर्षाखालील मुलीच्या गटात हेक्झॉथलॉन स्पर्धेत नवीन विक्रमासह सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे.
हेक्झॅथलॉन म्हणजे-१०० मी. धावणे, लांब उडी, गोळा फेक, उंच उडी, भाला फेक, २०० मी. धावणे एवढे प्रकार असतात. तिच्या गटात एकूण ४० स्पर्धक सहभागी झाले होते. या कामगिरीमुळे पालक वर्गाकडूनही तिचे कौतूक होत आहे. ४ ते ६ नोव्हेंबर २०२२ या कालवधीत सीआयएससीई आंतरशालेय राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत ठाण्यातील “ट्रॅक ॲन्ड फिल्ड मास्टर्स” क्लबच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
कु. ईवा मनोजने चार सुवर्ण व एक कास्य पदकासह वैयक्तीक चॅम्पियनशिप पटकावली. शिव छत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे झालेल्या स्पर्धेत कु. ईवा मनोज हिने ४०० मी. धा, खांब उडी, ४ X १०० मी रिले ,उंच उडी – ब्रान्स पदकासह वैयक्तीक कामगिरीसह सर्वोकृष्ट धावपटू म्हणून गौरवण्यात आले होते.
कु. प्रेक्षा कोलते ४०० मी.धा, २००मी. धा. रौप्य पदक व १०० मी धा. कास्यपदक, ४ X१०० मी. रिले सुर्वण पदक वैयक्तीक सर्वोत्तम कामगिरी, कु. ईशाना संतोष २०० मी.धा. कास्यपदक सर्वोत्तम कामगिरी, ४ X१०० मी.रिले सुर्वण पदक, श्रावणी घुडे उंच उडीत कास्य पदक वैयक्तीक सर्वोत्तम कामगिरी, कु. निकोल स्पेस्की ६०० मी. धावणे चौथा क्रमांक वैयक्तीक सर्वोत्तम कामगिरी, कु.आहाना चक्रवर्ती उत्कृष्ठ कामगिरी
या सर्व खेळाडूंना ठाणे येथील प्रशिक्षक दत्ता चव्हाण शिवछत्रपती पुरस्कर्ते यांच्याकडे दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे येथे त्यांना उत्तम प्रशिक्षण लाभत आहे. सर्व खेळाडूंनी एकूण सुवर्ण, रौप्य, कास्य पदके जिंकून उत्तम कामगिरी केल्यामुळे सीआयएससीई राष्ट्रीय स्तरावरील अथलेटिक्स स्पर्धेत कु. ईवा मनोज, कु.प्रेक्षा कोलते, यांची निवड एससीएफ्आय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.