जिल्ह्यात कोरोनाचे ६२ रुग्ण सक्रिय

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील नवीन कोरोना रूग्ण किंचित वाढले असून आज नऊ रुग्णांची भर पडली आहे. यात ठाणे शहरातील चार जणांचा समावेश आहे.

नवी मुंबई महापालिका हद्दीत पाच रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील उर्वरित नगरपालिका, महापालिका आणि ठाणे ग्रामीण भागात एकही रूग्ण मिळाला नाही.

जिल्ह्यात आत्तापर्यंत सात लाख ४७,३२३रूग्ण बाधित सापडले आहेत. रुग्णालयात आणि घरी ६२जणांवर उपचार सुरू आहेत. ठाणे शहरात १३जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३६,०५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ११,९६७जणांचा मृत्यू झाला आहे.