आयटी सल्लागाराला संचालकपदाच्या नोकरीचे आमिष दाखवून फसवले

ठाणे : वर्तकनगर येथे राहणा-या आणि व्यवसायाने आय.टी सल्लागार असलेल्या ५४ वर्षांच्या संदीप नाडकर्णी यांना संचालकपदाच्या नोकरीचे आमिष दाखवले आणि तीनजणांनी त्यांची फसवणूक करुन त्यांच्या क्रेडीट कार्ड खात्यातून तब्बल ६ लाख ६ हजार ६३७ रुपये हस्तांतरीत  केले. परंतु, त्यांना डेलॉईट कंपनीत कोणतीही नोकरी न देता तसेच त्यांच्याकडून घेतलेले पैसेही परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

संदीप नाडकर्णी यांना आरोपी अजय दीक्षित, सुमित गर्ग आणि विशाल शर्मा यांनी आपापसात संगनमत केले आणि त्यांना मोबाईलवरुन फोन केला आणि त्यांना ‘डेलॉईट’ या विख्यात कंपनीत संचालक या पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवले. नाडकर्णी आणि त्यांंच्या पत्नीच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून आणि एचडीएफसी क्रेडीट खात्यातून इन्फो एज सर्विसेस या कंपनीच्या खात्यावर आॅनलाईन हस्तांतरीत केले आणि त्यांची फसवणूक केली.

फिर्यादी नाडकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.