ठाणे जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने

ठाणे : जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली असून आज जिल्ह्यात फक्त दोन नवीन कोरोना रूग्ण सापडले आहेत. ठाणे शहरात एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही.

जिल्ह्यातील नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रत्येकी एक रुग्णाची नोंद झाली आहे. उर्वरित जिल्ह्यात कुठेही नवीन रूग्ण मिळाला नाही.

आत्तापर्यंत सात लाख ४७,३१४ रूग्ण बाधित सापडले आहेत तर सात लाख ३६,०४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णालयात आणि घरी ६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत ११,९६७जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.