ठाणे : नियम मोडणाऱ्या वाहनांना टोचन लावून उचलणारी गाडीचा सदोष असल्याची बाब एक सामाजिक कार्यकर्त्याने उघडकीस आणली आहे.
ठाणे महापालिकेच्या सावरकरनगर आणि वर्तकनगर प्रभाग समितीमार्फत अतिक्रमण करणारे फेरीवाले, हातगाड्या यांच्यावर कारवाई करावी करण्याकरिता टोचन वाहने वापरतात. हे वापरण्यात येणारे वाहन विना नंबरप्लेटचे असल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांना प्राप्त झाल्याने त्यांनी त्या वाहनावर पाळत ठेवली.
या वाहनाचा प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांचा 28 हजार रुपये दंड थकीत असून फिटनेस, पीयुसी संपल्याच्या अनेक त्रुटी आढळून आल्या. डॉक्टर बिनू वर्गीस यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडे तक्रार केल्यानंतर वाहन क्र. एमएच-२०-सीटी-१८०८ आरटीओ अधिकाऱ्यांनी जप्त केले.