ठाणे : वर्षभरात ठाणे आयुक्तालयात दाखल झालेल्या अपहरणाच्या ८४६ गुन्ह्यापैकी ७३६ गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत. यामध्ये २१५ मुलांचा समावेश आहे. तर ६११ मुलांचा समावेश आहे.
प्रामुख्याने हे गुन्हे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे आहेत. त्या गुन्ह्यांचा तपास न लागल्यानंतर सदरचे गुन्हे हे अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध शाखेकडे पाठविण्यात येतात. त्यानंतर वर्षभराचा काळ लोटल्यानंतर पोलीस पथक तपासाला सुरुवात करते. तर दुसरीकडे घरातून पळून गेलेली मुले, मुली या मात्र आपला मोबाईल नंबर बदलतात. त्यामुळे अनैतिक मानवी वाहतूक विभागाच्या पथकाला शोध घेण्यास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. दरम्यान उघड गुन्ह्यात अनेक मुली, मुली या विवाहित झाल्यानंतर पथकाने शोधून काढल्या असल्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिती सत्यजित चव्हाण यांनी दिली.
आक्टोबरमध्ये २१ केसेस आल्या होत्या. त्यापैकी १५ केसेस उघड करण्यात आलेल्या आहेत. तर चार गुन्ह्यांचा समांतर तपास सुरु आहे. अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध विभागाच्या पथकाने पिटा अंतर्गत धडक कारवाई केलेली आहे. २०२१ वर्षात २९ केसेसमध्ये पथकाने ५६ आरोपीना अटक केली. तर ७१ बळितांची सुटका करण्याची धडक कारवाई केली. पिटा अंतर्गत महिलांना मुलींना, पैशाचे अमिष दाखवून वेश्यावृत्तीत ढकलणाऱ्या दलालांची धरपकड करीत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येतो. तर फसलेल्या मुलींनाची सुटका करण्यात येते. सन २०२२ मध्ये अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध विभाग पोलीस पथकाने केलेल्या धडक कारवाईत घरातून पळून आलेल्या मुलींना वाममार्गाला लावून वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दलालनवर पिटा अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येते. या वर्षात तीन गुन्हे दाखल करून चार बळितांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे.