ठाणे : कर्नाक रोड ओव्हर ब्रिज तोडण्याच्या कामाच्या तयारीच्या आढावा घेताना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी हा पूल तोडण्यापूर्वी प्रवाशांना बल्क एसएमएस पाठवून कर्नाक पूल तोडण्यापूर्वी संपूर्ण माहिती द्यावी, अशी सूचना त्यांनी संबंधित रेल्वे अधिका-यांनी दिली.
महाव्यवस्थापकांनी १९ आणि २० नोव्हेंबर रोजी केल्या जाणा-या कर्नाक रोड पूल तोडण्याच्या कामाच्या तपशिलांचा आढावा घेतला. निर्माण, अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल, ऑपरेटिंग, कमर्शियल आणि आरपीएफ या सर्व विभागांनी ब्लॉकचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. पूल निकामी करण्यासंबंधीची सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असेही ते म्हणाले.
ब्लॉक दरम्यान सुरळीत आणि व्यत्ययमुक्त सेवा सुनिश्चित करण्यासाठी, मेल/एक्स्प्रेस गाड्या आणि उपनगरी गाड्यांच्या शॉर्ट टर्मिनेशन/शॉर्ट ओरिजिनेशनची योग्य आणि नियमित घोषणा करण्यात यावी आणि सर्व प्रवाशांना त्यांच्या संबंधित गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन/शॉर्ट टर्मिनेशनबाबत कळविण्यासाठी बल्क एसएमएसचा वापर कण्यावर भर देण्यात यावा, यावर त्यांनी भर दिला आहे.
प्रमुख स्थानकांवर हेल्प डेस्कची व्यवस्था आणि प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट आणि एसटी महामंडळ यांच्या समन्वयाने योग्य बससेवा व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सुरक्षेच्या पैलूंची खात्री करून रेल्वे सुरक्षा बलाने शासकीय रेल्वे पोलीस आणि राज्य पोलिसांशी समन्वय साधून ब्लॉक कालावधीत विविध स्थानकांवर पुरेसे बल कर्मचारी नियुक्त करावेत, अशीही सूचना दिली.
निष्कासित करण्याच्या तयारीबाबत श्री. लाहोटी यांनी अधिकाऱ्यांना मशीन्सची पूर्वतपासणी करून त्यांचे योग्य प्रकारे काम करण्याच्या सूचना दिल्या.