ठाणे: शहरातील नवीन कोरोना रूग्ण किंचित वाढले असून आज सहा नवीन रुग्णांची भर पडली आहे.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी तीन जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत एक लाख ९५,१६५ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २१६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ३८८ नागरिकांची चाचणी घेतली असून त्यामध्ये सहा जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २५ लाख ४५,३१९ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९७,३८१जण बाधित सापडले आहेत.