ठाण्यात कोरोनाचे सक्रिय रुग्ण ५०च्या खाली

ठाणे: शहरातील नवीन कोरोना रूग्णवाढ थांबली असून आज अवघा एक नवीन रूग्ण सापडला आहे. रुग्णालयात आणि घरी ५०पेक्षा कमी सक्रिय रूग्ण उरले आहेत.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी १०जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत एक लाख ९५,१६२ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २१६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील २४९ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये अवघा एक रूग्ण बाधित सापडला आहे. आत्तापर्यंत २५ लाख ४४,९३१ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९७,३७५जण बाधित मिळाले आहेत.