उल्हासनगरमध्ये हॉर्न वाजविल्याच्या रागातून बस चालकाला मारहाण

उल्हासनगर : हिललाईन पोलीस हद्दीतील भालगाव येथे नवी मुंबई महापालिका परिवहन बस चालकाने रस्त्यातील मोटरसायकल बाजूला करण्यासाठी हॉर्न वाजविला. या रागातून चौघाडीने बस चालकास मारहाण केली असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालगाव येथून सोमवारी दुपारी दिड वाजता कल्याणकडे जाणारी नवीमुंबई महापालिका परिवहन बस चालकाने रस्त्यात असलेली ऍक्टिव्हा मोटरसायकल बाजूला करण्यासाठी हॉर्न वाजविला. बसचा हॉर्न वाजविल्याचा राग बबलू म्हात्रे यांला येऊन त्याने बसचालक अनंत जाधव याला तीन साथीदारांसह मारहाण केली. तसेच बसमधील कॅमेरा व काच फोडून बसचे नुकसान करून सरकारी कामात व्यत्यय आणला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात बबलू म्हात्रे यांच्यासह चौघांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.