ठाण्यात अवघा एकच नवीन रुग्ण
ठाणे: शहरातील कोरोना रूग्ण वाढीला ब्रेक लागला असून आज अवघा एक नवीन रूग्ण सापडला आहे.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी २७जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ९५०४५ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ११७जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१६४जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील १६९ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये एक रूग्ण बाधित मिळाला आहे. आत्तापर्यंत २५ लाख ४२,४४६ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९७,३२६जण बाधित सापडले आहेत.