हसवणारा रडवून गेला

निखळ विनोदबुध्दी, विलक्षण निरीक्षण आणि भाषेवरील प्रभुत्व यांच्या जोरावर राजू श्रीवास्तव यानेस्वतःचा असा एक चाहतावर्ग निर्माण केला होता. साहजिकच त्याच्या आकस्मिक ‘एक्सिट’ने लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे. एका निरागस आणि आयुष्यात चार आनंदाचे क्षण आणि अनंत हसऱ्या आठवणी देणारा हा अवलिया जग सोडताना त्याच्या चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू ठेऊन गेला. स्टॅण्ड-अ‍प कॉमेडी अलिकडच्या काळात खूप लोकप्रिय झाली आहे. राजूहा किमान आपल्या देशातील त्याचा पाईक होता. ‘लाफ्टर चॅलेंज’च्या निमित्ताने आपण त्याला प्रथम पाहिले. ती त्याची राष्ट्रीय एन्ट्री होती. तत्पूर्वी तो लहान-मोठ्या कार्यक्रमात प्रेक्षकांना हसवण्याचे काम करीत
होता. परंतु त्याची गंभीर दखल घेतली ती या लोकप्रिय कार्यक्रमाने. नविन प्रभाकर, सुनिल पाल, भागवत मान (विद्यमान पंजाबचे मुख्यमंत्री) आदींनी लोकांसमोर विशुद्ध विनोदाची ओळख करुन दिली. कधी काल्पनिक तर कधी अवतीभोवती घडणाऱ्या छोट्या-छोट्या प्रसंगांतून ही मंडळी विनोदाच्या जागा शोधत हे प्रसंग फु लवत असत. आम्हाला आठवतात राजू श्रीवास्तवचे दोन कार्यक्रम, ज्यात त्याने वर्णन केलेहोतेते लग्नसमारंभातील बुफेचे आणि दसर ु े होते रेल्वेच्या रिकाम्या डब्याच्या छतावर लटकलेली हॅण्डल्स! ही हॅण्डल्स श्रीवास्तव यांना शाळकरी निवांत पाय हलवत बसलेल्या अल्लड मुलांसारखी वाटली होती. तर बुफेच्या ताटाचे वर्णन करताना पापड कसा भाताखाली गुदमरुन जातो याचे नेमके आणि रोचक वर्णन त्याने केलेहोते. निरीक्षणाला कल्पकतेची जोड देण्याचे कसब राजूमध्ये ठासून भरलेहोते. त्याची प्रचिती त्याच्या शेकडो कार्यक्रमात येते. गजोधर भय्या असो की गब्बरसिंग, हे राजूने ज्या पद्धतीने वठवलेते आठवले की एक कलाकार वेशभूषा नसताना, केवळ हावभाव आणि भाषेचे चढ-उतार याच्या जोरावर एक हुबेहुब चित्र कसे उभे करु शकतो, याची प्रचिती येते. राजूसारखे अनेक विनोदवीर आपल्याला आनंद देत असतात. परंतु ‘या सम हा’ वर्गात मोडणारा राजूच होता. भारतीयांच्या मानसिकतेमध्ये मानवी स्वभावांच्या असंख्य छटा दिसतील. संवेदनशील अशा मनाच्या गाभाऱ्यात खळखळून ते खुदकन हसणारे मन जीवंत ठेवण्याचे काम विनोदवीर करीत असतात. कधी-कधी हा विनोद उपहासाच्या मार्गानेचिमट के ाढून जातो, तर कधी माणसाच्या मर्यादा दाखवणारे अंजनही घालून जातो. राजूच्या विनोदात हे दोन्ही पैलूहोते. त्यामुळे त्याचा विनोद पाचकळ वाटला नाही. कमरेखाली त्यांनी तो नेला नाही की केवळ नकला करुन त्याने
टाळ्या मिळवल्या नाहीत. त्याच्या विनोदाला दर्जा होता. विशेष म्हणजे त्यानेतो सातत्याने अनेक वर्ष टिकवला. त्यामुळेच राजू श्रीवास्तव हा एक नंबरवर सदैव राहिला. त्याला मानाचा मुजरा!