ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी झाली आहे. आज ३६ रुग्णांची भर पडली तर एक जण दगावला आहे.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ५४जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ९३,९२५ रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ३४५जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २,१५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ५३० नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये ३६जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २५ लाख २०,६२० ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ९६,४२९ रूग्ण बाधित मिळाले आहेत.