केंद्रीय मंत्री अनुराग ठाकू र यांनी कल्याण-डोंबिवली महापालिके च्या कारभाराचे जाहीर वाभाडे काढल्यामुळे या भोंगळ कारभाराला आतापर्यंत अप्रत्यक्षरित्या का होईना समरन देणाऱ् ्थ या स्थानिक भाजपा लोकप्रतिनिधींची मोठी गोची झाली असणार. या महापालिके तील नागरी कामांची संथगती आणि अर्धवट कामांमुळे शहरास आलेला बकालपणा हा सातत्याने टीके चा विषय बनत आला असला तरी त्यावर पत्रकारांखेरीज कोणी भाष्य के ले नव्हते. श्री. ठाकू र यांनी जनतेचा हा राग बोलून दाखवताना प्रशासनाला दोन महिन्यांत सुधारण्याचा इशारा दिला आहे. मंत्री महोदयांनी पक्षाचा आणि लोकसभा मतदार संघातील प्रभारी म्हणून महापालिके च्या कामाचा आढावा घेतला. काही प्रकल्पांची कामे दहा-दहा वर्षे सुरु असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संतापलेल्या ठाकू र यांनी मग अधिकाऱ्यांना फै लावर घेतले. त्यांचा पगार काढला आणि काम न करताना झोप येतेच कशी असा रोखठोक सवालही के ला. असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात अधूनमधून डोकावत असतो. परंतु या प्रश्नांतून अपेक्षित उत्तरदायित्व प्रशासनाने केव्हाच ‘ऑप्शन’ टाकल्यामुळे ते विचारणे वायफळ असते असा दृढ समज जनतेने करुन घेतला आहे. वास्तविक असे प्रश्न विचारण्याची वेळ जनतेवर येऊ नये यासाठी प्रशासन कटीबद्ध असायला हवे. परंतु मग या पालिकांमधून मिळणारा मलिदा खाण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही या भीतीने ही यंत्रणा ठेके दारांच्या दावणीला बांधली गेली. ज्या ठेके दारांवर कारवाईचा बडगा उचलायला हवा त्यांना गोंजरण्याचे काम अधिकारी-कर्मचारी करीत असतात. भले मग ठेके दाराने काम विहीत वेळेत पूर्ण के ले नाही तरी बेहत्तर! श्री. ठाकू र यांना हे दृष्टचक्र भेदायचे असेल तर त्यांनी खरोखरीच दोन महिन्यांनी पुनश्च येऊन आपल्या टीके चा काही परिणाम झाला की नाही हे त्यांना कळून चुके ल. श्री. ठाकू र यांनी घेतलेल्या कडक पावित्र्याचे स्वागत करायला हवे. हे आसूड कोणीतरी वापरायला हवे होते. परंतु ज्यांनी वापरायचे त्यांचेच हात बरबटलेले असायचे. अधिकारी-ठेके दार-नेते या अभद्र महाआघाडीमुळे कोणीच भूमिका घेत नव्हते. अर्थात श्री. ठाकू र यांनीही ही भूमिका राजकारणाच्या पलिकडे ठेवावी. आगामी निवडणुकीत मतदारांना मोहीत करण्यासाठी अशी टीका करु नये. जो जाब त्यांनी विचारला आहे तो प्रामाणिक असायला हवा. अन्यथा आतापर्यंत अशा कडक भाषेचा अर्थ ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे करा’ एवढ्यापुरता सीमित होता. जनतेच्या करातून हे प्रकल्प होत असतात, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगारही जनतेच्या पैशांतून होत असतात. त्यांना न्याय देण्याचे काम कधी नव्हे ते होईल अशी आशा आहे. त्यामुळे ठाकू र यांच्या अनु‘रागा’चे स्वागत!