ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा किंचित वाढला असून आज ३७ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या नागरिकांपैकी २८जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ९३,८७२ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ३६३जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २,१५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ५६८ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये ३७जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २५ लाख २०,०९० ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९६,३९३जण बाधित मिळाले आहेत.