स्वातंत्र्यदिनी पाळीव प्राण्यांची परेड

ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ठाण्यात पाळीव प्राण्यांची परेड हिरानंदानी सर्कल ते खेवरा सर्कल या मार्गावर होणार आहे.

डॉग वर्ल्ड इंडिया आणि पापा पावसोम यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षाचे औचित्य साधून हे सर्वात मोठ्या पथ संचलन आयोजित करण्यात आले आहे. या संचलनामध्ये ७५पेक्षा जास्त पाळीव प्राणी आणि त्यांचे पालक सहभागी होणार आहेत.

पाळीव प्राण्यांना टी शर्ट परिधान केले जाणार आहेत तर त्यांचे पालक हातात तिरंगा झेंडा हातात घेऊन त्यांच्यासोबत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह सर्कल ते खेवरा सर्कल दरम्यान पथसंचलन करणार आहेत. या पथ संचलनामध्ये सहभागी होणाऱ्या ठाणेकरांना प्रशस्ती)पत्रक आणि टी शर्ट मोफत दिले जाणार आहेत.