बारामतीत विहिरीचे पाणी चोरले म्हणून गुन्हा

अंबरनाथच्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची तक्रार

पुणे : वीज चोरीसोबत पाणी चोरीदेखील होत असते. पाणी चोरण्यासाठी एखादी पाइपलाइन फोडून पाणी चोरले जाते. मात्र, बारामतीत चक्क पोलिसांनी विहिरीतून पाणी चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना प्रादुर्भाव असताना लॉकडाऊनच्या काळापासून या पाण्याची चोरी झाली असून या प्रकरणी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बारामती तालुक्यात चक्क एका विहिरीतून पाणी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. कोरोना प्रादुर्भाव असताना लॉकडाऊनच्या काळापासून या पाण्याची चोरी झाली असून या प्रकरणी सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल केल आहे. ही घटना बारामती तालुक्यातील सुपे गावात घडली आहे. निवृत्त पीएसआय सुधाकर तुकाराम रोकडे यांनी याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात प्रकाश जाधव, विकास जाधव, राहूल जाधव व अतुल जाधव या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार 10 फेब्रुवारी 2020 ते 6 ऑगस्ट 2022 या कालावधीत विहिरीतून पाणी चोरल्याचे फिर्यादीत म्हटल आहे.

मुळचे बारामती तालुक्यातील सुपे येथील असलेले सुधाकर रोकडे हे सध्या ठाण्यात अंबरनाथ येथे वास्तव्यास आहे. कोरोनाच्या काळात त्यांचे गावाकडे येणे जाणे झाले नाही. कोरोनानंतर रोकडे मूळ गावी आले तेव्हा आरोपींनी त्यांच्या विहिरीवर मीटर बसवून पाणी चोरल्याचे रोकडे यांच्या लक्षात आलं. त्यावरून रोकडेनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात धाव घेतली. रोकडे हे सेवानिवृत्तीनंतर ते अंबरनाथ येथे स्थायिक झाले आहेत. अधूनमधून गावी येत ते ज्वारीचे पिक घेत होते. कोरोना महामारीच्या काळात ते इकडे न आल्याचा फायदा घेत वीजेचा मीटर बसवत त्यांच्या विहिरीतील लाखो लिटर पाणी वापरले.

फिर्यादीने यासंबंधी प्रकाश व राहुल यांची शेतात भेट घेतली. परंतु त्यांनी अरेरावीची भाषा वापरून शिविगाळ, दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या कारणावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.