ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व जलवाहिनीचे तातडीचे देखभाल व दुरूस्तीचे काम एमआयडीसीने घेतले आहे.
या दुरुस्ती कामामुळे शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समिती व मुंब्रा प्रभाग समितीमधील मुंब्रा बायपास पासुन मुंब्रा फायर ब्रिगेडपर्यत (किस्मत कॉलनी, चांदनगर, एम.एम.व्हॅली, अमृतनगर, अल्मास कॉलनी) तसेच कळवा प्रभाग समितीमधील काही भाग व कोलशेत, वागळे इस्टेटमधील काही परिसरात आठ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पुर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.