मुंबईतील 13 वर्षाच्या एका मुलाची त्याच्याच मित्रांनी निर्घृण हत्या करुन खंडणीवसुलीचा प्रयत्न के ला. याप्रकरणी दोघा तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांची नावे प्रसिद्ध झाल्यामुळे ती सज्ञान असावीत असे म्हणता येईल. या तिघांच्या मैत्रीचे (?) कारण धुम्रपानाची सवय होती. तरुणवर्गात, खास करुन शाळकरी मुलांमध्ये (आणि आता तर मुलींमध्येही !) वाढत चाललेल्या या व्यसनांवर आम्ही यापूर्वीही लिहिले आहे. त्याबाबत शाळा आणि पालक यांनी आवश्यक ती काळजी घेतलीही असेल. परंतु ज्याअर्थी अशी प्रकरणे घडत आहेत, त्याअर्थी मुलांना/मुलींना वेसण घालण्याची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल. सदर प्रकरण समजून घेतले तर पालकांना आपल्या पाल्याच्या बाबतीत किती आघाड्यांवर जागरुक रहावं लागेल याचा अं दाज येईल. आपल्या पाल्यांचा मित्रपरिवार कोणता, त्यांची कौटुबिं क पार्श्वभूमी लक्षात
घेतली जाते काय? त्यांच्या वयात बरेच अं तर असेल (जे या प्रकरणात दिसते) तर असा कोणता धागा त्यांना जोडतो, अशा मैत्रीच्या शुद्धतेबाबत खातरजमा करुन
घेतली जाते काय? आपले पाल्य शाळा-महाविद्यालयात कधी जाते, घरी परत येणे कधी अपेक्षित आहे. फावल्या वेळेत ते करते काय, त्याच्या शैक्षणिक प्रगतीचा अधूनमधून आढावा घेतला जातो काय, असे असंख्य प्रश्न पालकांनी स्वत:ला विचारायला हवेत. सदर प्रकरणातील हत्या झालेल्या मुलाच्या मामाने बहिणीला भाच्याचे ‘उद्योग’ सांगितले होते. आता मुलगा गमावून बसलेल्या या माऊलीने त्यावर कोणते पाऊल उचलले असावे हे कळण्यास मार्ग नाही. परंतु के वळ धुम्रपान आणि त्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दष्पर ु िणामांपुरता हा विषय मर्यादित नाही. आरोपींनी या मुलास व्यसन लावून त्याच्या कौटुबिंक स्थितीचाही अभ्यास के ला होता. दर्ुदैवी मुलाच्या आईने अलिकडेच नवीन गृहखरेदी के ली होती. त्याची आरोपींना कल्पना होती. त्यामुळे या मुलाचे अपहरण करुन खंडणी वसुल करण्याचा कट त्यांनी
शिजवला. त्याचा शेवट खुनात झाला हे वाईट झाले. या कथित आर्थिक स्थितीचा सुगावा आरोपींना लागला कसा, याचा तपास पोलिस करतील, परंतु पालक म्हणून
आपले पाल्य कोणाच्या संगतीत आहे हे तपासायला नको होते काय? ठाण्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रतिष्ठित शाळांच्या बाहेर मुले-मुली धुम्रपान करताना
दिसतात. या परिसरात शाळा भरताना आणि सुटताना पोलिसांचे भरारी पथक चक्कर टाकू न घेतले तरी या वाईट सवयीला आळा बसेल. या सवयीचा दसु रा टप्पा
गुन्हेगारी स्वरुपाचा असल्यामुळे पोलिसांचेच काम वाढणार आहे. त्यापेक्षा प्रतिबंधात्मक कारवाई के ली तर बिघडले कु ठे? शाळांनीही पालक-सभेत या विषयावर
बोलायला हवे. बिड्या पिणारे शाळकरी हे चित्रच अस्वस्थ करणारे आहे. त्याला एकत्रितपणेच सामोरे जावे लागेल.