ठाणे : शहरातील कोरोना रूग्ण वाढीचा आलेख खाली आला असून २२ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर जिल्ह्यात १०० रूग्ण वाढले आहेत. ठाण्यात तीनशेपेक्षा कमी सक्रिय रूग्ण असून सुदैवाने एकही जण दगावला नाही.
जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात रूग्णवाढ रोडावली असून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ५१ रुग्णांची भर पडली आहे. सात जण कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर येथे १०, उल्हासनगरमध्ये पाच आणि भिवंडी महापालिका हद्दीत दोन रुग्णांची भर पडली. ठाणे ग्रामीणमध्ये तीन रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि घरी ७७४ जणांवर उपचार सुरू आहेत तर ठाणे शहरातील रुग्णालयात आणि घरी २८७ जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३३,९९३ रूग्ण बाधित सापडले आहेत तर सात लाख २१,१८७जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. ११,९२७ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.