भात खरेदीवर बंद केलेला बोनस पुन्हा सुरु होणार

आमदार कथोरे यांच्या प्रयत्नांना यश

मुरबाड : महाविकास आघाडी सरकारने बंद केलेला भात विक्रीवर मिळणारा बोनस पुन्हा एकदा सुरू केल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात आदिवासी महामंडळ  शेतक-यांकडून भातखरेदी करते. या खरेदी केलेल्या भातावर या आधी राज्य शासनाच्या माध्यमातून बोनस दिला जात होता, मात्र महाविकास आघाडी सरकारने बोनस बंद केला होता. त्यामुळे शेतक-यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले होते. याची दखल आमदार किसन कथोरे, आमदार संजय राठोड आणि अन्य 15 आमदारांनी बंद करण्यात आलेला बोनस पुन्हा सुरू करावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 26 जुलै रोजी मंत्रालयात भेट घेऊन मागणी पत्र दिले होते. या पत्राच्या अनुषंगाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाने शेतक-यांच्या बोनस मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.